नवाजुद्दीन सिद्धिकीच्या आगामी 'मॉन्सून शूटआउट'चा ट्रेलर लाँच झाला आहे. हा पहिलाच 'इंटरअॅक्टिव्ह ट्रेलर' असल्याने सोशल मिडियावर सध्या या ट्रेलरची चांगलीच चर्चा आहे.या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिरियल किलरच्या व विजय वर्मा हा अभिनेता पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. जेव्हा सिरियल किलरच्या शोधात असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याच्या समोर मारेकरी उभा राहतो तेव्हा त्याला मारायचे की नाही, असा संभ्रम त्याच्या मनात निर्माण होतो. आणि त्याच क्षणी हा ट्रेलर पॉज होतो. आता यापुढचा निर्णय दिग्दर्शकाने प्रेक्षकांवरच सोडला आहे...'टू शूट ऑर नॉट टू शूट?' प्रेक्षक निवडतील त्या पर्यायनुसार त्यांना चित्रपटाचा पुढचा ट्रेलर दिसणार आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
